लिंबूणीच्या झाडावर गुटीचे प्रयोग यशस्वी

    दिनांक : 29-Jun-2020
Total Views |
 
 
धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.नितीन चौधरी यांचे यश
 
 
फैजपूर, ता.यावल : तापी परिसर विद्या मंडळ संचालित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील वनस्पतीशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. नितीन चौधरी यांनी लॉकडाऊन कालावधीचा यथायोग्य वापर करून लिबुणीच्या झाडावर गुटी या कलम प्रकारचे यशस्वी प्रयोग करून रोपे तयार केले.
 
 

Faizpur_Nimbuli_1 &n 
 
वनस्पती शास्त्र विषयाचा पर्यावरणातील नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याच्या उद्देशाने कोरोना महामारीच्या काळात सुयोग्य उपयोग केला. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख प्रा.डॉ. डी.ए. कुमावत व सहकारी प्राध्यापकानी त्यांच्या या कामाचे कौतुक केले.