गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

    दिनांक : 28-Jun-2020
Total Views |


 

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना सध्या घरातच विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे जनसंपर्क प्रमुख प्रथेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे.

 
 
Shankarsinh Vaghela_1&nbs

गेल्या तीन दिवसांपासून शंकरसिंह वाघेला यांना ताप येत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर वाघेला यांना त्यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी गृह विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे, असेही पटेल यांनी स्पष्ट केले. एका वृत्तसंस्थेला त्यांनी याबाबत माहिती दिली.

 
 

कोरोनाच्या इतर लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे वाघेला यांच्यात दिसत नाहीत. त्यांना ताप येतो आहे, एवढे एकच लक्षण त्यांच्यात दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण असलेल्या अनेक रुग्णालयांना त्यांनी भेट दिली. त्यातून कदाचित त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असेही पटेल यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्ण असलेली रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर्स या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. कदाचित त्यामुळेच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.