चायनीज कंपनीकडून पीएम केअर फंडाला ७ कोटींची मदत

    दिनांक : 28-Jun-2020
Total Views |


 
 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या पृष्ठभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी चायनीज टेलीकॉम गिअर मेकर कंपनी हुआवेने पीएम केअर फंडासाठी ७ कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हुआवे या कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारताला शरीराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली होती.

 

huawei_1  H x W 
 
हुआवे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय चेन यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतातील सध्याच्या कोरोनाच्या स्थिती विरोधात लढण्यासाठी शरिराचे तापमान तपासणीसंर्भातील अद्ययावत तंत्रज्ञानचा अभ्यास चीनमध्ये सुरु आहे. यात लवकरच आम्हाला यश येईल. हुआवे कंपनीने दिलेली मदत सध्या ट्विटरवर चर्चेचा विषय आहे. नेटकऱ्यांनी चीनकडून मदत घेण्यावर आक्षेप नोंदवला आहे. तर काहींनी टिकटॉकने किती मदत केली? अशी विचारणा केली आहे.