पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २९ पासून

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी
 

job_1  H x W: 0 

जळगाव, २५ जून
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि लघु उद्योग भारती, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांनी रिक्तपदे ऑनलाईन माध्यमाद्वारे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना यामुळे संधी उपलब्ध होणार आहे.
 
 
विविध कंपन्यांनी एस. एस. सी, एच. एस. सी, आय. टी. आय मधील विविध ट्रेडधारक आणि डिप्लोमा अशा शैक्षणिक पात्रता धारकांच्या १५० जागा भरावयाच्या आहेत. रोजगाराच्या संधी प्राप्त करून देणार्‍या कंपनी आणि त्यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने मुलाखतींसाठी पत्ता तथा संपर्कक्रमांक असे- एसिम श्रीनिसन्स प्रा.लि.चाकण/औरंगाबाद (०२४०-२३३५४२९), (७२१९६०११०८), चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी म.चोपडा (९५७९०४५१३३), तिस्या बिल्डींग पोडक्टस प्रा. लि. पुणे- ई-मेलर्-ींळळिपर्.ाीपेींींळीूरळाशिु.लेा, युरेका फोर्ब्स, जळगाव (८७८८५७९३४२), नवकिसान बायो प्लॅन्टेक लि. जळगाव (०२५७-२२२४८९७), या कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध आहेत.
 
 
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उमेदवारांनी उद्योजकांशी २९ जून ते ३ जुलैदरम्यान दूरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा ई-मेलद्वारे ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधून रोजगार उपलब्धतेच्या संधीचा फायदा घ्यावा, असे अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी कळविले आहे.