ओसामा बिन लादेन मेला नाही, शहीद झाला!

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 

इमरान खान यांची मुक्ताफळे; चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू

 

 
इस्लामाबाद : अमेरिकेवरील 9/11 रोजीच्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार आणि जगभरात दहशतवादी कारवाया करणारा अल्कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन अमेरिकेने केलेल्या छुप्या हल्ल्यात शहीद झाला, अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे पंतप्रधान इमान खान यांनी उधळली असून, यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगापुढे उघड झाला आहे.
 
 
 

Imran Khan_1  H 

पाकिस्तानच्या संसदेत दहशतवादावर चर्चा सुरू असताना, इमरान खान यांनी अमेरिकेच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिकेला आपल्या देशाने प्रामाणिकपणे साथ दिली. मात्र, अमेरिकेमुळे आपल्याला बदनाम व्हावे लागले. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेला अपयश आले, त्याचे खापरही पाकिस्तानवर फोडले, असे इमान म्हणाले. अमेरिकन हवाई दलाच्या विशेष पथकाने पाकिस्तानात घुसून केलेल्या हल्ल्यात लादेन शहीद झाला आणि त्यानंतर पाकिस्तानला याची कल्पना दिली. यामुळे जगात पाकिस्तानची नाचक्की झाली, असेही ते म्हणाले.

 
 

अमेरिकेने सुरू केलेल्या दहशतवादविरोधी लढ्यात पाकिस्तानने साथ दिली. या लढाईत 70 हजारावर लोकांनी प्राण गमावले. पाकिस्तानमध्ये 2010 नंतर ड्रोन हल्ले झाले. मात्र, त्यावेळच्या सरकारने फक्त निदा करण्याशिवाय काहीच केले नाही. हे ड्रोन हल्ले पाकिस्तानच्या तत्कालीन सरकारच्या परवानगीने झाले असल्याची माहिती एकाने दिली आहे.

 
 

लगेच केली सावरासावर

दरम्यान, इमरान खान यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानात जोरदार प्रतिकिया उमटल्या आहेत. विरोधी पक्षांनी इमान खान यांचा निषेध केला असून, इमान खान यांचे सरकार दहशतवादाचे समर्थक आहे की विरोधक, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. या वक्तव्याचे विपरीत पडसाद उमटल्यानंतर सरकारकडून तातडीने बाजू सावरण्याचे प्रयत्न झाले. इमान यांनी ओसामा लादेनला ठार केले, असा उल्लेख तीन वेळा करण्यात आला असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट करण्यात आले.