वर्षअखेरीस भारताला मिळणार एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


रशियाने दर्शवली सहमती

 

मॉस्को : सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील एस-४०० ही अत्याधुनिक हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला पुरवणार आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाच्या उपपंतप्रधानांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील -४०० देण्यास रशियाने सहमती दर्शवली आहे. यापूर्वी ही यंत्रणा २०२१ पर्यंत भारताला देण्यात येणार होते.

 

Russia_1  H x W 
 

२०२४ पर्यंत रशिया भारताला दरवर्षी एक एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा देणार आहे, अशी माहिती रशियातील वृत्तपत्र कॉमरसेंटने दिली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताला ही अत्याधुनिक संरक्षण यंत्रणा प्रणाली मिळाली, तर भारत पुढील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये एस-४०० देखील सहभागी करू शकेल. शत्रूच्या विमानांचा आणि क्षेपणास्त्रांचा सामना करण्यासाठी या यंत्रणेचा वापर होऊ शकेल, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

तत्पूर्वी, रशिया दौर्यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक बोरिसोव्ह यांनी भारताला लवकर शस्त्रास्त्र पुरवण्याचे आश्वासन दिले होते. भारत आणि रशिया यांच्यात विशेष सहकार्य आहे आणि भारताबरोबरचा करार जलद पूर्ण होईल, असे त्यांनी आश्वासन दिल्याचे राजनाथ सिंह म्हणाले होते.