इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


नवी दिल्ली : दिवसागणित देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

 
 
 

Modi_1  H x W:
 
 

या वर्षाच्या सुरूवातीस काही लोकांचा असा अंदाज होता की भारतात कोरोना विषाणूचा परिणाम खूप तीव्र स्वरूपाचा असेल. परंतु, लॉकडाऊन, सरकारने घेतलेले पुढाकार आणि जनतेनेचा लढा या कारणास्तव भारतात इतर देशांच्या तुलनेत चांगली स्थिती आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

 

 दिल्लीतील आरामदायी सरकारी कार्यालयांमधून नव्हे तर लोकांच्या अभिप्रायानंतर आम्ही निर्णय घेतले आहेत, असे मोदी यावेळी म्हणाले. भारतात इतर राष्ट्रांच्या तुलनेत स्थिती चांगली आहे. तसेच भारतातील रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. कोणाचाही मृत्यू होणे ही दुर्देवी बाब आहे. देशात एक दशलक्ष लोकसंख्येमागे १२ मृत्यूंची नोंद आहे. तर इटलीमध्ये हाच दर एक दशलक्ष लोकसंख्येमागे ५०० इतका आहे. लोकांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्यासारखे प्रकार आपल्याला करायला हवे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 

कोटींहून अधिक कुटुंबांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहे. बेघरांना आश्रय देण्यासाठी दीड कोटीहून अधिक घरे उभारण्यात आली आहेत. तसेच आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना असल्याचे मोदी म्हणाले.