पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ वाचविण्यासाठी 7 वर्षांच्या ‘जन्नत’चा पुढाकार

26 Jun 2020 11:44:00
 
 

JANNAT1_1  H x
 
 
जम्मू-काश्मिरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ म्हणतात. येथील दल सरोवर खूपच प्रसिद्ध आहे. पर्यटक खास बोटिंगसाठी येथे येत असतात. जे पर्यटक श्रीनगरला जातात, ते या सरोवराला नक्कीच भेट देतात. मात्र या सरोवरात मोठ्या प्रमाणावर घाण झाली आहे. ती घाण दूर करून सरोवर स्वच्छ करण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे एका 7 वर्षीय मुलीने घेतली आहे. तिचे नाव आहे जन्नत. ती मागील दोन वर्षांपासून दलच्या स्वच्छतेसाठी झटते आहे.
 
 
असे वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्‍या जन्नतची दखल घेऊन तिची गोष्ट आता हैदराबाद येथील शाळेतील पाठ्यपुस्तकात छापण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दररोज शाळा सुटल्यानंतर जन्नत आपल्या वडिलांसोबत छोट्याशा बोटीने जाऊन या सरोवराची स्वच्छता करते.
 
 
याविषयी बोलताना जन्नत म्हणते की, वडिलांपासून मला सरोवराची स्वच्छता करण्याची प्रेरणा मिळाली. माझी ओळख माझ्या वडिलांमुळेच आहे. आपल्या नावाप्रमाणेच ही चिमुकली पृथ्वीवरील ‘जन्नत’ स्वच्छ ठेवण्यासाठी काम करीत आहे. तिच्या या कार्याचे सोशल मीडियावरही नेटकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येते.
Powered By Sangraha 9.0