गरिमा यादव...ब्युटी क्वीन ते लेफ्टनंट

    दिनांक : 26-Jun-2020
Total Views |
 
 
GARIMA YADAV_1  
 
 
हरियाणाची रहिवासी असलेली गरिमा यादव.. तशी कॉलेज स्टुडंट...दिसायला अत्यंत सुंदर म्हणून सहजच सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला....त्यात विजयी झाली... मग पुढच्या... अजून पुढच्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेत गेली अन् प्रत्येक स्पर्धेत विजयी होत गेली.... आता तिला इटलीला आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायला जायची संधी मिळाली होती.... जय्यत तयारी सुरू होती....
अन्..... नेमकी त्याच दरम्यान सीडीएस परीक्षा होती.
 
 
(सीडीएस - कंबाइन्ड डिफेन्स सर्विसेस) पहिल्याच प्रयत्नात गरिमा ही परीक्षा उत्तीर्ण झाली... आता तिला चेन्नईच्या इंडियन आर्मी- ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) (ओटीए)मध्ये पुढील प्रशिक्षणासाठी जावे लागणार होते....आता तिची द्विधा मनस्थिती झाली.... एकीकडे आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा... मॉडेलिंग करियर... त्यातूनच पुढे बॉलिवूडमध्ये संधीची शक्यता...
 
 
अन् दुसरीकडे लहानपणापासून मनाशी ठरवलेले भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर काम करण्याचे स्वप्न.....
रात्रभर विचार केला.... पालकांनी निर्णय तिच्यावर सोपवला.... कोणत्याही निर्णया मागे खंबीरपणाने आम्ही उभे राहू याची ग्वाही आई-वडिलांनी दिली.... 
आता गरिमा अजूनच गोंधळलेल्या अवस्थेत गेली....
सकाळी उठल्यावर निग्रहाने तिने आपला निर्णय आईला सांगितला....
आता ती इटलीला न जाता चेन्नईला जाणार होती...... भारतीय सैन्य दलाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी....
नुकतेच तिने प्रशिक्षण पूर्ण केले आहे... व ती आताभारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे.....
आम्हाला तुझा अभिमान वाटतो...!
 
 
भारतीय तरुण-तरुणीसाठी अतिशय प्रेरणादायी ही गोष्ट आहे. ध्येयाने प्रेरित झालेले युवाच सैन्यात दाखल होतात आणि वेळप्रसंगी अतुलनीय शौर्य गाजवतात.अभिमान आहे आम्हाला आमच्या सैन्य दलाचा..आता गरिमाही त्याचा एक भाग होणार आहे. तरूणाईला प्रेरणा देणारी ही बाब आहे.