गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

25 Jun 2020 14:31:10

more_1  H x W:
 
 
लडाख,
पूर्व लडाखच्या सीमेवरून भारत-चीनमध्ये संघर्ष वाढल्याने तणावात भर पडली. आठवडाभरापूर्वी चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये नदीवरील पुलाचे काम सुरु असताना दोन जवानांना पुरातून वाचविताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे.
सचिन विक्रम मोरे असे या वीर जवानाचे नाव असून, ते ११५ इंजिनियरिंग रेजिमेंटमध्ये सेवेत होते. सध्या ते गलवान खोऱ्यात कर्तव्यावर होते. शहीद सचिन मोरे हे मालेगाव तालुक्यातील साकुरी गावचे रहिवासी होते. त्यांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच गावामध्ये शोककळा पसरली आहे.
 
भारतीय लष्कराकडून गलवान खोऱ्यात नदीवर पुलाचे बांधकाम सुरू होते. त्यादरम्यान, नदीला आलेल्या पुरात दोन जवान पडले आणि ते वाहून जाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी सचिन मोरे यांनी प्रयत्न केले. मात्र त्यात सचिन यांना वीरमरण आले. ही दुर्घटना काल घडली. सचिन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि आई-वडील असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0