रिंकूचे चाहते म्हणतात... ‘रिंकू, तुला आमचा फुल्ल सपोर्ट’!

25 Jun 2020 13:00:10
 
 
‘सैराट’च्या घवघवीत यशानंतर रिंकू राजगुरू या छोट्या शहरातून आलेल्या अभिनेत्रीने मागे वळून पाहिलेच नाही. ती वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, मालिका करून तिचं अभिनय कौशल्य दाखवत आहे. मात्र रिंकूची विशेष चर्चा होते ती तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर! सैराटमधून पदार्पण केलेली रिंकू आणि आता इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करणारी रिंकू यामध्ये बराच फरक आहे. तिचे इन्स्टाग्रामवरील सेल्फी, बोल्ड अंदाजातील फोटो, लॉकडाऊनमध्ये शूट केलेले व्हिडीओ यामुळे रिंकू कायम चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती इन्स्टाग्रामवर विशेष सक्रिय आहे.दरम्यान, नेहमी ग्लॅमरस फोटो पोस्ट करणार्‍या रिंकूने नुकताच एक फोटो शेअर केला असून त्यात तिने कॅप्शन दिले आहे की, ‘जेवढी तुम्हाला तुमची गरज असते तेवढी कुणालाही तुमची गरज नसते’.

RUNKU RAJGURU_1 &nbs 
 
तिच्या या फोटोवर अनेकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. काही युजरनी असं म्हटलं आहे की, ‘आमचा तुला फुल्ल सपोर्ट आहे’. रिंकूच्या या फोटोवर अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील हृदयाची स्माइली टाकत फोटोचं कौतुक केलं आहे.या फोटोमध्ये ती प्रचंड आत्मविश्वासपूर्ण दिसत असल्याने सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिचा एक साडीतील व्हिडीओ देखील शेअर केला होता. या 20 सेकंदाच्या मराठमोळ्या अंदाजातील व्हिडीओचं देखील खूप कौतुक झालं होतं.काही दिवसांपूर्वी रिंकू ‘हंड्रेड’ या हिंदी वेबसीरिजमध्ये दिसली होती. त्यातही रिंकूने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. या सीरिजमध्ये तिने ‘नेत्रा पाटील’ ही भूमिका साकारली आहे. तसेच यात लारा दत्ताही आहे.
Powered By Sangraha 9.0