नंदुरबारमध्ये स्टेट ट्यूब, सिरिन साहित्य आढळले उघड्यावर

23 Jun 2020 19:01:34
 

NBR_Stet TUbe_1 &nbs 
 
नंदुरबार : शहरातील जुना बैल बाजार परिसरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात आलेले स्टेट ट्यूब आणि सिरिन साहित्य बेवारसरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच आणि सिरीन साहित्याचा साठा पालिकेच्या पथकाने ताब्यात घेतला. अज्ञाताने रक्ताने भरलेल्या स्टेट ट्यूब आणि सिरीन साहित्य फेकल्याने याप्रकरणी चौकशी होऊन कारवाई करण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.
 
 
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळेजवळ सोमवार रोजी सांयकाळच्या सुमारास एका पिशवीमध्ये रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात आलेल्या स्टेट ट्यूब साहित्य आणि सिरिन आढळून आल्या आहेत. या स्टेट ट्यूब आणि सीरिनमध्ये काही प्रमाणात रक्त असल्याचे दिसल्याने खळबळ उडाली. बेवारसरित्या सिरिन साहित्य आढळल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यासह नगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पालिकेच्या पथकाने बेवारस आढळलेल्या स्टेट ट्यूब व सिरीन साहित्याचा साठा ताब्यात घेत कारवाई केली. परंतू हा बेवारस असलेला सिरिन साठा कुणी फेकला असावा? व का फेकला असावा? याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बेजबाबदार अज्ञाताचा शोध घेऊन सखोल चौकशी करून याप्रकरणी कारवाई करावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0