पतंजलीकडून ‘कोरोनिल’ आयुर्वेदिक औषध लाँच

    दिनांक : 23-Jun-2020
Total Views |


 
Baba Ramdev _1  
 

नवी दिल्ली : जगभरातील अनेक कंपन्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधनही सुरू आहे. याच पृष्ठभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला असून ते आज लाँच करण्यात आले आहे. आहे. हरिद्वार येथे आज दुपारी १२ वाजता दिव्य 'कोरोनिल' टॅबलेट लाँच करण्यात आले. योगगुरु बाबा रामदेव आणि पंतजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले.

 
 

कोरोनिल औषध पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी बनवले आहे. 'कोरोनिल' चे क्लिनिकल कंट्रोल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे, असा कंपनीचा दावा आहे. सध्या या औषधाची निर्मिती हरिद्वारची दिव्य फार्मेसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडकडून केली जात आहे. नियामकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर औषधांच्या क्लिनिकल चाचण्या इंदूर आणि जयपूरमध्ये झाल्या. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा.

 

 
बाळकृष्ण यांनी सांगितले की, कोविड -१९ चा उद्रेक होताच शास्त्रज्ञांची टीम या कामात गुंतली होती. पहिल्यांदा स्टिमुलेशनद्वारे त्या कम्पाऊंड्स ओळखल्या गेल्या तेव्हा ते विषाणूंविरूद्ध लढतात आणि शरीरात त्याचा प्रसार रोखतात. पतंजली सीईओच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल १०० टक्के आहे. त्यांचा असा दावा आहे की, कोरोनिल कोविड -१९ रुग्णांना ते १४ दिवसांत बरे करू शकतो. कोरोनिलमध्ये गिलोय, अश्वगंधा, तुळशी, स्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा - सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते, असे बाळकृष्ण म्हणाले.
 
 

अश्वगंधातील कोविड -१९ चे रिसेप्टर-बाइंडिंग डोमेन (आरबीडी) शरीराच्या अँजिओटेन्सीन-कन्व्हर्टींग एंजाइमला (एसीई) मिळू देत नाही. म्हणजेच कोरोना मानवी शरीराच्या आरोग्य पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याच वेळी, गिलोग कोरोना संक्रमणास प्रतिबंध करते. तुळसी कोविड -१९ च्या आरएनएवर हल्ला करते आणि त्याचे वाढण्यास प्रतिबंध करते. मंगळवारपासून दिव्या कोरोनिल टॅबलेट बाजारात उपलब्ध होईल. कंपनी श्वसारी वटीच्या गोळ्याही विक्री करेल. श्वसरी रस जाड श्लेष्मा तयार होण्यास प्रतिबंधित करतो. तसेच फुस्फुसात होणारी सूज कमी करते.