भाविकांशिवाय जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात

23 Jun 2020 15:56:40


 

Jagannath Puri Yatra1_1&n

भुवनेश्वर : ओदिशातील ऐतिहासिक जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर आज जगन्नाथ पुरी रथयात्रेला भाविकांशिवाय सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, या रथयात्रेपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर या रथयात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर जगन्नाथ मंदिरातील एकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना या रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती ओदिशाचे कायदामंत्री प्रताप जेना यांनी दिली. दरम्यान, या रथयात्रेपूर्वी मंदिरात सॅनिटायझेशनचे काम करण्यात आले.

 

केंद्र सरकार आणि मंदिर व्यवस्थापन समितीशी समन्वय साधून ओदिशा सरकार कोरोना विषाणू साथीच्या पृष्ठभूमीवर आरोग्यविषयक निकष पाळून रथयात्रा पार पाडेल, अशी माहिती सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आणि . एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाला ओदिशा सरकारतर्फे देण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करता, मंदिर संस्थान आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, अशी भूमिका केंद्र सरकारनेही खंडपीठापुढे मांडल्यानंतर न्यायालयाने रथयात्रा काढण्यास सशर्त परवानगी दिली.
Powered By Sangraha 9.0