डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला संबोधले ‘कुंग फ्लू’

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 
 

कोरोना प्रसारावरून पुन्हा टीका

 
Trump_1  H x W:

 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सभेमध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराचा ठपका पुन्हा चीनवर ठेवला. यावेळी त्यांनीकुंग फ्लूअसा विषाणूचा उल्लेख करीत चीनवर जोरदार हल्ला चढवला.
 

चीनच्या वुहान शहरातून कोरोना संसर्ग जगभरात पसरला. आतापर्यंत जगभरात चार लाख 50 हजार जणांचा मृत्यू झाला असून, 85 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. या संसर्गाने अमेरिकेसमोरही मोठे आव्हान उभे केले आहे. अमेरिकेतील मृतकांचा आकडा अधिक असून, ट्रम्प यांनी त्यासाठी चीनला दोषी धरले आहे.

 

शनिवारी ओक्लाहोमामधील तुल्सा येथे आयोजित प्रचारसभेत ट्रम्प यांनी जागतिक महामारी कोरोनासाठी केवळ चीन जबाबदार असल्याचे ठामपणे सांगितले. ते म्हणाले की, मी याला कुंग फ्लू ( कुंग फू हा चीनमधील मार्शल आर्टचा प्रकार आहे) म्हणू शकतो. त्याचा उल्लेख 20 वेगवेगळ्या नावांनी करता येईल. अनेकजण त्याला विषाणू म्हणतात, जो की तो आहेच. शिवाय फ्लू असेही संबोधतात. माझ्या माहितीनुसार आपल्याकडे कोरोनाची विसेक तरी नावे आहेत, असे सांगत त्यांनी चीनला डिवचण्याचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, जॉन हॉपकिन्स कोरोना विषाणू केंद्रानुसार, अमेरिकेत बाधितांची संख्या 22 लाख आणि मृतांची संख्या एक लाख 19 हजार इतकी आहे.