गोव्यात ‘कोरोना’चा पहिला बळी

    दिनांक : 22-Jun-2020
Total Views |


 
Corona _1  H x
 

पणजी : गोव्यात सोमवारी कोराना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. सत्तरी तालूक्यातील मोर्ले गावातील 85 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सोमवारी सकाळी दिली. राज्यात आतापर्यंत 818 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 135 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

 राणे यांनी ट्विटरद्वारे संदेश देताना सांगितले, की आपल्या मतदारसंघातील मोर्ले गावातील एका 85 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आपल्याला दुख: झाले आहे. तो कोरोनापॉझिटिव्हअसल्याचा आढळून आल्याने त्याच्यावर मडगावच्या कोविड इस्पितळात उपचार सुरू होते. त्याच्या कुटुंबांच्या दुखा: आम्ही सामील आहोत. राज्यातील हा कोरोनाचा पहिला बळी आहे.

 

दुसर्या एका ट्विटमध्ये राणे म्हणाले, की यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. राज्यातील जनतेला आपण विश्वास देऊ इच्छितो, की आमची सर्व टीम गोमंतकीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी वावरत आहे. ही एक दुदैवी घटना असून आम्ही सर्व त्या कुटुंबियांसोबत उभे आहोत.

 

मोर्ले -सत्तरी हा भागकटेंन्मेंट झोनम्हणून राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. सदर रुग्ण हा मागील चार वर्षे आजारी असून अंथरूणावर खिळून होता. त्याला श्वासोश्वासाचा त्रास सुरू झाल्याने शनिवारी गोमेकॉ इस्पितळात हलविण्यात आले होते. त्यानंत करण्यात आलेल्या चाचणीत तो कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाल्यावर त्याला मडगावच्या कोविड इस्पितळात हलविण्यात आले होते.

 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ८५ वर्षीय रुग्णाला अस्थमा, डायबेटिस आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.