सारा, अर्जुनसह योगासनं करुन सचिनने साजरा केला फादर्स डे

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |
 
Sachin Yoga_1  
 
मुंबई : जागतिक योग दिन आणि पितृदिन जगभरात साजरा झाला. सध्याच्या कोरोना व्हायरसच्या कठीण काळात ६ वा योगदिन घरीच योगा करुन साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे ’घरी योगा आणि सारा आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या सोबत योगासने करुन सचिनने आजचा फादर्स डे सेलिब्रेट केला आहे. त्याचबरोबर योगदिनाचे महत्त्व देखील राखले गेले आहे. वृक्षासन करतानाचा सारा, अर्जुन सोबतचा फोटो सचिनने शेअर केला आहे.
 
 
फोटो शेअर करत सचिनने लिहिले, एकत्र योगासने करुन फादर्स डे चे सेलिब्रेशन.सचिन तेंडुलकर याने फादर्स डे निमित्त वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन खास पोस्ट केली आहे. त्याचबरोबर योगदिन आणि पितृदिन असा एकत्रितपणे आपल्या मुलांसोबत साजरा केला आहे. सचिनच्या या अनोख्या युक्तीमुळे दोन्ही दिवसांचं महत्त्व अधोरेखितं तर झालंच. पण हटके सेलिब्रेशनही झालं.