तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; भारताला मोठे यश मिळण्याची शक्यता

    दिनांक : 21-Jun-2020
Total Views |

Tahavur Rana_1  
 
 
 
लॉस एंजेलिस : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेत वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला अमेरिकेमध्ये पुन्हा अटक करण्यात आली आहे. राणा हा पाकिस्तानी-कॅनडाचा नागरिक असून, त्याला अमेरिकेने २६/११ हल्ल्यामध्ये सहभागी असल्याने शिक्षाही केली होती.
 
 
तहव्वूर राणाला अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा अटक केली. ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करीत असून, राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा २०२१ मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्यापूर्वीच सोडून देण्यात आले होते.
 
 
मुंबई हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली त्याला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत विविध ठिकाणी हल्ले केले होते. यामध्ये अमेरिकी नागरिकांसह १६६ जणांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्याप्रकरणी अमेरिकेमध्ये तहव्वूर राणला अटक झाली होती. अमेरिकी न्यायालयाने त्याला २०१३ मध्ये १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या हल्ल्याचा दुसरा सूत्रधार हाङ्गिज सईद पाकिस्तानात उजळ माथ्याने ङ्गिरत आहे. राणा भारताच्या हाती आल्यास पुन्हा पाकिस्तानविरोधात भारताला आक्रमक होता येणार आहे.
 
 
राणाच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे तयार करणे काहीसे कठीण आहे. या प्रकरणामध्ये पाच प्रशासकीय संस्था येतात. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, गृह मंत्रालय, विधि मंत्रालय आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार आणि विधि मंत्रालय या सर्वांची वेगवेगळी प्रत्यार्पण प्रक्रिया आहे. यामुळे या पाचही विभागांशी समनवय ठेवून काम करावे लागणार आहे.