‘आर्या आंबेकर’चे रूप फॅन्सना पाडतेय प्रेमात...

20 Jun 2020 12:09:28
आर्या ही गायनासोबतच अभिनयामध्येही चमकणारी कलावंत गायिका.तिचे नाव घेताच आपल्यासमोर येतेय ते तिचे सुमधूर गायन आणि आकर्षून घेणारे सौंदर्य. आर्या आपल्या या कलागुणांमुळे प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आजपर्यंत आर्याने अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स् तसेच मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठीसुध्दा गाणी गायिली आहेत.आर्या नेहमीच आपल्या फॅन्समुळे चर्चेत असते. ती वेगवेगळ्या स्टाईलमधील फोटो शेअर करते. याचप्रकारे आर्याने नुकतेच तिच्या दिलखेचक रूपातील साडीवर काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये आर्याचे सौंदर्य आणखी खुलून समोर आले आहे.
 
 
ARYA AMBEKAR_1  
 
 
या फोटोंना आर्याच्या चाहतेवर्गाकडून वेगवेगळ्या कॉमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव तिच्यावर होत आहे. तिचे हे रूप पाहून फॅन्स तिच्या जणू प्रेमातच पडले आहे.
 
 
तिच्या हटके लूक आणि स्टाईलमुळे फॅशनसाठी ती नेहमीच सजग असते. तसेच तिचा हसरा चेहरा आणि स्मितहास्यामुळे आर्या सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.
Powered By Sangraha 9.0