जवखेडे येथील मानसी पाटील झाली उपजिल्हाधिकारी

20 Jun 2020 21:29:19
 
Mansi Patil_1  
 
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा गावाची मानसी पाटील हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. तिने संपूर्ण राज्यात मुलींमध्ये प्रथम येत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. जवखेडासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
 
 
मानसी पाटील ह्या सध्या नाशिक येथे वस्तू कर निरीक्षक (एसटीआय) म्हणून कार्यरत आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासात खंड पडू न देता एमपीएससी परीक्षेत दुसर्‍यांदा यश गाठले. मानसीताई ह्या निवृत्त विज्ञान शिक्षक एस.वाय.पाटील व मनीषा पाटील यांची कनिष्ठ कन्या असून युनियन बँकेचे वरिष्ठ प्रबंधक मयूर पाटील यांच्या भगिनी तर जवखेड्याचे प्रगतिशील शेतकरी चंद्रभान पाटील व प्रकाश पाटील यांची पुतणी आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 
Powered By Sangraha 9.0