अभिषेक बच्चन दिसणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर

20 Jun 2020 11:57:53
सध्या अभिषेक बच्चन वेब सीरीज ‘ब्रीथः इन टू द शॅडोज’मधून डिजिटल प्लॅटफार्मवर येण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांच्या या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये अभिषेक बच्चन अत्यंत इंटेंस लूकमध्ये दिसेल. या वेब सिरीजमध्ये अमित साध पुन्हा एकदा सीनियर इन्स्पेक्टर कबीर सावंतच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. 10 जुलैला ही सिरीज रिलीज होणार असून यात नित्या मेनन आणि सयामी खेरसुध्दा एका वेगळ्या अंदाजात दिसतील.
 
ABHISHEK BACHCHAN_1 
 
अभिषेक बच्चन याबद्दल म्हणतात की, अ‍ॅमेझॉन ओरिजिनल ‘ब्रीथः इन टू द शॅडोज’सोबत ते डिजिटल ऑन-स्क्रीनमध्ये पदार्पण करीत असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली होती. या शोच्या माध्यमातून लाँचिंगची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांचे जे प्रेम आणि समर्थन मिळाले, यातून माझा प्रेक्षकांशी जोडण्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. माझी पहिली डिजिटल सीरिज लाँच करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.या वेब सीरीजमध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार रोमांच अनुभवता येईल. येणार्‍या दिवसांची वाट बघत आहे...कारण मी हळूहळू जगासमोर ‘ब्रीथः इन टू द शॅडोज’ घेवून येणार आहे. या शो चा ट्रेलर 1 जुलै रोजी लाँच होईल, असेही अभिषेक म्हणाला. या सीरीजबद्दल चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढीस लागली आहे.
Powered By Sangraha 9.0