हरभजन सिंगचे ट्वीट चीनच्या लागले जिव्हारी

19 Jun 2020 22:22:58
 
Harbhajan_1  H
 
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग याने चीनी मालाचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे. हरभजन सिंग याचे ट्वीट चीनच्या चांगलेच जिव्हारी लागले असून चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने या ट्वीटवर आगपाखड केलीय.
 
 
लद्दाखच्या गलवान खोर्‍यात 15 जून रोजी भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती. यात भारतीय सेनेचे 20 जवान शहीद झालेत. तर चीनचे 43 सैनिक ठार झाले आहेत. या घटनेनंतर भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग याने भारतीय जवान शहीद झाल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना सर्व प्रकारच्या चिनी वस्तूंवर बंदी घाला, असं ट्विट केले होते. हरभजनच्या चाहत्यांनी त्याच्या या ट्विटचे स्वागत केले.
 
 
चिनी मुखपत्र असलेल्या ’ग्लोबल टाइम्स’च्या मुख्य संपादकाने हभजन सिंग यांच्या या ट्विटवर चांगलीच आगपाखड केली. त्याने हरभजनच्या एका बातमीचा फोटो शेअर करत हरभजन सिंग वर टीका केली. भारतातील एका लोकप्रिय क्रिकेटपटूने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. यामुळे भारतीय संस्कृतीची नकारात्मक छबी दिसून येते, अशा आशयाचे ट्विट त्याने केले. दरम्यान भारतीय व्यापारी आणि नागरिकांनीही चिनी सामानावर बहिष्कार टाकण्यास प्रारंभ केल्यामुळे चीनला चांगलीच धडकी भरली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0