सोन्या-चांदीची झळाळी उतरली

    दिनांक : 19-Jun-2020
Total Views |
 
Gold Silver_1  
 
नवी दिल्ली : सोन्याच्या स्पॉट किंमतीबरोबर वायदा किंमतीतही चढउतार पाहायला मिळतो. व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी आजे वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.
 
शुक्रवारी सकाळी एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या ऑगस्ट 2020 साठीच्या किंमतीमध्ये घसरण होत दर 47,330 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. तर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या गुरूवारी सोन्याचे भाव वाढले होते. गुरूवारी सोन्याची स्पॉट किंमत 280 रुपयांनी वाढून 48,305 रुपये प्रति तोळा इतकी होती. दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी सकाळी सोन्याच्या स्पॉट आणि वायदा भावामध्ये वाढ झाली आहे. शुक्रवारी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याबरोबरच चांदीची किंमत देखील कमी झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सकाळी जुलै 2020 साठीच्या चांदीचा भाव 99 रुपयांनी कमी झाला आहे. या घसरणीनंतर चांदी 47,762 रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेंड करत होती. सराफा बाजारात चांदीची स्पॉट किंमत गुरूवारी 260 रुपयांनी वाढली होती. या वाढीनंतर चांदीची किंमत 49,452 रुपये प्रति किलोग्राम इतकी झाली होती.
 
 
सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा...
1) सोन्याच्या शुद्धतेनुसार सोन्याचे दागिने सुद्धा वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. 24 कॅरेट सोनं सगळ्यात शुद्ध सोनं असतं. 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये 91.6 टक्के सोन्याची शुद्धता असते.
2) सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती दोन गोष्टींवरून ठरतात- एक म्हणजे दागिन्यामध्ये सोन्याचा हिस्सा काय आहे. उदा. 22 कॅरेट की 18 कॅरेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिने बनवण्यासाठी सोन्यामध्ये मिसळण्यात येणारा धातू.