56 हजार बेरोजगारांना रेल्वे मंत्रालयाद्वारे सरकारी नोकरी

    दिनांक : 19-Jun-2020
Total Views |
 
Rilway Recruitment_1 
 
 
मुंबई :  कोरोना विषाणूमुळे देशभरातील अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला. असे असताना रेल्वे मंत्रालयाने असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या सुमारे 56 हजार जागा भरल्या आहेत. यामुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
निवेदनात म्हटले आहे की, रेल्वे भरती मंडळांने 31 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान जाहीर केलेल्या 64,371 जागांसाठी संयुक्त भरती जाहीर केली होती. या जागांसाठी एकूण 47,45,176 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. या भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यात चाचणी घेण्यात आली. कंम्प्यूटर आधारित परीक्षा त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली गेली. यामधून 56,378 उमेदवारांची असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियनच्या जागांसाठी निवड केली गेली. निवडलेल्या उमेदवारांच्या पॅनेलला मान्यता देण्यात आली असून 40 हजार 420 उमेदवारांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली. बाकी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया सुरु आहे. यातील काही उमेदवारांचे प्रशिक्षणदेखील पूर्ण झाले आहे.