चवदार पनीर मटर खिमा

    दिनांक : 17-Jun-2020
Total Views |
 
 
पनीरचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आलाच असेल म्हणूनच आज आम्ही पनीर आणि मटारचे मिश्रण असलेला एक भन्नाट पदार्थ आपल्या भेटीला घेऊन आलो आहोत.. हा चवदार पदार्थ आपण खाल्ल्यावर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवणार याची खात्री आहे...चला तर मग ट्राय करूया चवदार भन्नाट अशी रेसिपी...
 
 
PANIR KEEMA _1  
 
साहित्य - पनीर 250 ग्राम, मटार 1 कप, कांदा 2, टोमॅटो 2, हिरवी मिरची 4 (कमी तिखट), हिंग 1/4 टीस्पून, हळद 1/4 टीस्पून, जिरे 1/4 टीस्पून, आल लसूण पेस्ट 1 टेबलस्पून, काश्मीरी मिरची पावडर 1 टेबलस्पून, गरम मसाला 1 टीस्पून, किचन किंग मसाला 1 टीस्पून, मीठ स्वादानुसार, कोंथिबीर मुठभर
 
 
कृती - एका भांडयात तेल गरम करा., त्यात हिंग, हळद, जिरे, मिरची घाला., कांदा घाला, मीठ घाला म्हणजे कांदा लगेच ब्राउन होतो., बारीक चिरलेले टोमॅटो, आल लसूण पेस्ट घाला., आता सुके मसाले
घाला., नीट परता., कुस्करलेले पनीर घाला., मटार घाला., कोंथिबीर घाला., थोडा वेळ शिजू द्या., झाला तुमचा चवदार पनीर मटार खिमा