विद्युतमार्गावर धावले पहिले डबल स्टेक कंटेनर

16 Jun 2020 15:59:16
 
Double Steak Container_1&
 
नवी दिल्ली : पश्‍चिम रेल्वेने ‘डबल-स्टेक कंटेनर’ यशस्वी रीत्या चालवून जागतिक विक्रम नोंदविला आहे. आतापर्यंत जगातील सर्वांत मोठ्या विकसित देशांनाही हे यश प्राप्त झालेले नाही. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टि्वट करून याबाबतची माहिती दिली आहे.
 
 
पश्‍चिम रेल्वेने हाय राईज ओव्हरहेड इक्विपमेंटपासून (ओएचई) इलेक्ट्रिङ्गाईड स्टेशनदरम्यान मध्यवर्ती डबल-स्टेक कंटेनर ट्रेन यशस्वीपणे चालवून रेल्वेेेने नवीन जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
 
 
डबल-स्टेक कंटेनर ट्रेनचे अनेक ङ्गायदे आहेत. हा कंटेनर केवळ पर्यावरणास अनुकूल नाही, तर क्रियान्वित करणे देखील अधिक किङ्गायतशीर आहे. यामुळे दुपटीहून अधिक वेळ वाचू शकतो. हे कंटेनर इलेक्ट्रिक लाईनद्वारे चालविले जाते, ज्याची उंची मर्यादित आहे.
Powered By Sangraha 9.0