चेन्नई सुपर किंग्जच्या चप्पल दुरूस्त करणार्‍याला इरफानची मदत

16 Jun 2020 15:39:14
 
 
 
Irfan Khan_1  H
 
चेन्नई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हातावरचे पोट असणार्‍यांचे हाल होत आहेत. असेच सध्या चेन्नईमधील एक चांभार देखील संकटात सापडला आहे. आर भास्करन नाव असलेला हा चांभार सर्वाधिक कमाई आयपीएल दरम्यान करतो. पण सध्या आयपीएलचा १३ वा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला असल्याने त्यांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी इरफान पठाण त्यांच्या मदतीला धावून आला आहे.
 
 
जेव्हा इरफानला याबद्दल कळाले तेव्हा त्याने २५ हजार रुपयांची मदत भास्करन यांना केली. याबद्दल भास्करन यांनी सांगितले की, मागील आठवड्यात इरफान पठाण यांनी (२५,००० रुपये) पाठविले. मी कुटुंबासाठी किराणा सामान विकत घेतला. कोणतेही काम नसल्याने मी पैसे उधार घेतले होते आणि मला ते परत द्यावे लागतील. मी कसे जगेल हे मला माहित नाही. जर क्रिकेट लवकरच परत आले नसेल तर मी संपून जाईन.’
 
 
भास्करन यांच्याबद्दल इसपीएनच्या डिजीटल मॅक्झिनमध्ये दिलेला रिपोर्ट वाचल्यानंतर इरफानने त्यांना मदत केली आहे. इरफानने इएसपीएनच्या रोनक कपूर यांना संपर्क साधत भास्करन यांच्याबद्दल विचारणा केली होती. सामन्यांच्या वेळी भास्करन खेळाडूंच्या आणि सामना अधिकार्‍यांच्या क्षेत्राबाहेर एका छोट्या खोलीत बसतात. तर इतरवेळी चिदंबरम स्टेडियम बाहेर फुटपाथवर बसून ते काम करतात. पण सध्या क्रिकेट सामने होत नसल्याने त्यांना २ महिन्यांपासून संघर्ष करावा लागत आहे.
Powered By Sangraha 9.0