माजी खा.हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाने निधन

    दिनांक : 16-Jun-2020
Total Views |
 
 
जळगाव : भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा रावेर लोकसभा मतदारसंघातील माजी खा. हरिभाऊ माधव जावळे (वय ६७) यांचे मंगळवार १६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुंबईत निधन झाले.
 
 
हरिभाऊ जावळे यांना ३ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जून रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हरविल्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी मंगळवार १६ रोजी दुपारी साडेबारा वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.