बनवा गरमागरम ‘भजी’चे वेगवेगळे रेसिपीज

16 Jun 2020 15:57:22
 
 
bhaji_1  H x W:
 
 
पावसाळयात भजी खाण्याचा आनंद वेगळाच असतो. पण पावसाळा तीन महिने मुक्कामी असल्याने सतत एकाच चवीची भजी खाण्याचा नंतर कंटाळा येवू लागतो. पण थोडी कल्पकता वापरून वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवणे अशक्य नाही. अशाच काही रेसिपी बद्दल आपण जाणून घेऊया.
 
 
पापडाची भजी
साहीत्य : 4 उडीदाचे कच्चे पापड़, एक ते दीड कप ताक, एक कप तांदळाचे पीठ, एक चमचा आलं आणि मिर्चीची पेस्ट,थोडी कोथिंबिर, अर्धा चमचा हळद,चवीपुरतेमीठ, तळण्यासाठी तेल
कृती :- एका बाऊल मधे पापडाचे तुकडे घेऊन त्यावर ताक घाला, थोडावेळ भिजु द्या. भिजल्यानंतर हाताने कुस्करून घ्या. त्यात आलमिरची पेस्ट, हळद, मीठ घालून त्याचे एकसारखे गोळे बनवा. नंतर गरमगरम तेलात तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
 
पालक बटाटा भजी
साहीत्य- दोन मोठे उकडलेले बटाटे, एक बाऊल बारीक चिरलेला पालक, दोन कप बेसन, हिंग, चार टेबलस्पून तांदूळ पीठ, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडी कोथिबिंर
चवीनुसार मीठ, पाव चमचा खायचा सोडा.
 
 
चमचमीत ‘ब्रेड गोल्ड कॉईन’,
कृती : बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यात चिरलेला पालक टाकावा. हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. त्यात तिखट, मीठ व खायचा सोडा टाकावा. नंतर एका बाऊल मधे पीठ, बेसन व इतर सर्व साहित्य घालून घ्या व पाणी घालून भिजवा. पीठ साधारण डोश्याच्या पीठा प्रमाणे ठेवावे. तयार मिश्रण पीठात घालावेत. एक एक करून भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावी. हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसतीही छान लागतात.
 
 
मक्याच्या दाण्यांची भजी
साहित्य : पाच कणसांचे (स्वीट कॉर्न)दाणे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ, दिड चमचा गरम मसाला, अडीच वाटी बेसन, तेल
कृति : मक्याचे दाणे धुऊन मिक्सरमधुन काढणे, त्यात तिखट, मीठ, गरम मसाला व जेवढे मावेल तेवढेच बेसन व अर्धा डाव तेल गरम करून घालावे. मिश्रण एकत्र करावे. अजिबात पाणी घालू नये. कढईत तेल चांगले तापले की छोटी छोटी भजी तळून घ्यावीत. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावी.
Powered By Sangraha 9.0