सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या शहरांत पुन्हा लॉकडाऊनबद्दल अनुकूलता

16 Jun 2020 15:48:32
 
 
‘लोकल सर्कल्स’च्या ऑनलाइन सर्व्हेचे निष्कर्ष जाहीर
 

Lockdown_1  H x 
 
 
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने केंद्र सरकार १८ जूनपासून पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. केंद्र सरकारने मात्र हा दावा फेटाळला असून चुकीचा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. ही एक अफवा असून विश्वास ठेऊ नका असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
 
 
पीआयबीने हा मेसेज खोटा असल्याची माहिती देणारं ट्विट केलं आहे. असा कोणाताही प्रस्ताव विचाराधीन नसून अफवा पसरवणार्‍यांपासून सावध राहा असं त्यांनी स्प्ष्ट सांगितलं आहे. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील लॉकडाउन पुन्हा वाढवला जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा दावा फेटाळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लॉकडाउन वाढवला नसून, उगाच दुकानांबाहेर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे.
 
 
दुसरीकडे तामिळनाडूने करोनाचा प्रादुर्भाव असणार्‍या चार शहरांमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडानची कठोर अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी इतर शहरांना शिथीलता असणार आहे. यादरम्यान ङेलरश्रउळीलश्रशी ने देशात एका महिन्यासाठी लॉकडाउन वाढवला जावा का ? यासंबधी एक सर्व्हे केला असता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने हा सर्व्हे प्रसिद्ध केला आहे. यामधील अनेकांनी लॉकडाउन पुन्हा वाढवला जावा अशी मागणी केली आहे. तसंच करोनाचा फटका बसलेल्या शहरांमध्ये कठोर लॉकडाउन लागू करावा अशीही मागणी केली आहे. देशातील २२१ जिल्ह्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. ४६ हजार लोक या सर्व्हेत सहभागी झाले होते. महत्त्वाचं म्हणजे ६० टक्क्यांहून जास्त लोकांनी मुंबई आणि चेन्नईत लॉकडाउन वाढवला जावा असं मत नोंदवलं आहे. सहभागी होणार्‍यांनी किमान चार आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवला जावा या प्रश्नावर सहमती नोंदवली आहे. दरम्यान दिल्लीतील ७९ टक्के लोकांना लॉकडाउन वाढवला जावा असं म्हटलं आहे.
Powered By Sangraha 9.0