बार्सिलोनाचा मार्लोका संघावर विजय

16 Jun 2020 15:44:28
 
 
स्पॅनिश लीग स्पर्धेत मेस्सीचे धूमधडाक्यात पुनरागमन
 

Spanish Football_1 & 
 
माद्रिद  : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय स्पॅनिश लीग फुटूबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना महत्त्वपूर्ण गोल करताना बार्सिलोना संघाला मार्लोका संघावर विजय मिळवून दिला.
 
 
रविवारच्या सामन्यापूर्वी मेस्सीसह विविध स्टार खेळाडूंनी सामना खेळण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. मेस्सीनेही मार्लोका संघाविरुद्धच्या लढतीत भाग घेतला. बार्सिलोनाने मार्लोका संघावर ४-० अशी सहज मात केली व सामना जिंकला.
 
 
कोरोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर पडलेली होती. या स्पर्धेचे काही सामनेही झाले होते. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने जगभरातील विविध स्पर्धा एकतर रद्द झाल्या किंवा लांबणीवर टाकल्या गेल्या होत्या.
 
 
कोरोनाचा फटका या स्पॅनिश लीगसह युरोपातील अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना बसला. गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाचा युरोपातील धोका काहीसा कमी झाल्यानंतर या स्पर्धांना पुन्हा सुरूवात झाली.
Powered By Sangraha 9.0