टी-२० क्रिकेट होणार अतिआक्रमक

14 Jun 2020 16:49:07

T_20_Cricket_1   
 
मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा टी-२० क्रिकेट दाखल झाले तेव्हाच त्याच्या आक्रमकतेची चर्चा होऊ लागली. आता या क्रिकेटचा वेग आणखी वाढवून जास्त लोकप्रिय करण्यासाठी काही नियम प्रायोगिक तत्त्वावर राबवले जाणार आहेत.
 
याची सुरुवात ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये होत आहे. त्यात २० षटकांच्या सामन्यात दोन पॉवर प्ले ठेवण्यात येतील. तसेच वाइड चेंडूवरही फ्री-हिट देण्यात येतील. आधीच्या आराखड्यात केवळ नो-बॉलवरच फ्री-हिट देण्यात येत होती. या सामन्यात आता दोन पॉवर प्ले असतील. पहिला पॉवर प्ले ६ षटकांचा होता व पहिल्या १० षटकांतच घेता येत होता. आता हा २ षटकांचा दुसरा पॉवर प्ले नंतरच्या १० षटकांत घेता येणार आहे. या बदलांमुळे हे क्रिकेट जास्त आक्रमक व रंगतदार होणार आहे. हे प्रायोगिक बदल जर यशस्वी ठरले तर येत्या काळात आयपीएलच नव्हे तर आयसीसीकडून सर्वच स्तरांच्या टी-२० सामन्यात या बदलांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील या मानाच्या स्पर्धेत या नियमांना खेळाडूंकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहिले जाणार असून त्यांची मतेही घेण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0