अभियंता बबनराव जगदाळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

14 Jun 2020 15:58:24
 
taking bribe_1  
 
नवापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका बांधकाम ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत पिपंरीपाडा (ता. नंदुरबार) येथे रस्त्यावर स्लॅब ड्रेन (पूल) तसेच जिल्हा परिषद दुरुस्तीचे कामे व पंचायत समितीच्या दुरुस्तीच्या कामांचे ठेके घेऊन कामे पूर्ण केले आहेत. त्याची ४४ लाखांचे बिल मंजूर होऊन रक्कम ठेकेदाराला मिळाली आहे. मात्र ही मंजुरी करताना अडीच टक्क्यांप्रमाणे एक लाख पाच हजाराची रक्कम अभियंता जगदाळे यांनी मागितली होती. त्यापोटी २० हजार रूपये आधी दिलेही होते. उर्वरीत रक्कम देण्याचे ठरले होते. उर्वरित ८५ हजार रूपये देण्याची ठेकेदाराची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला होता. पडताळणीअंती विभागाने आज सापळा लावला होता. विभागाचे उपअधिक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल अहिरराव, उत्तम महाजन, संजय गुमाने, दीपक चित्ते, अमोल मराठे, संदीप नावाडेकर, ज्योती पाटील, मनोज अहिरे यांनी सापळा रचला. त्यानुसार ठेकेदाराने पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील बबन जगदाळे यांच्या कार्यालयात ८५ हजाराची लाच दिली. त्याचवेळी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
Powered By Sangraha 9.0