मनपाची न्यू बी.जे.मार्केटसह पोलनपेठमध्ये कारवाई

13 Jun 2020 14:19:36
एकूण २३ दुकाने केली ‘सील’
 
 
bj Market_1  H  
 
 
जळगाव : शहरात शासकीत तसेच खासगी मार्केटमधील दुकाने उघडण्यास मनाई आहे. दरम्यान, शुक्रवारी अनेक दुकाने अर्धे शटर उघडून सुरु असल्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाघुळे यांनी न्यू बी.जे.मार्केटमधील १७ तर पोलन पेठमधील ६ अशा एकूण २३ दुकाने सील करण्याची कारवाई केली. यावेळी दुकानदार आणि मनपा कर्मचार्‍यांमध्ये शाब्दीक वादही झाला.
 
 
सकाळी पथक न्यू बी.जे.मार्केटमध्ये गेले तेव्हा येथे अनेक दुकाने उघडी होती. तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंग तसेच शासनाने सूचविलेल्या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे ही कारवाई झाली. दरम्यान, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लॉकडाऊनमुळे काही प्रमाणात शिथिलता आली असून जून महिन्यापासून दुकानदारांना सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्याची परवानगी शासनाने दिली आहे. परंतु, अनेक दुकानदार नियमांनुसार वागत नसल्यामुळे मनपा प्रशासनाकडून दररोज अशा दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे.
 
 
आपण सुरक्षित राहून इतरांचीही काळजी घ्यावी. तसेच शासनाच्या नियमांचे तसेच सूचनांचे पालन करावे. अन्यथा यापुढेही गंभीर स्वरुपात कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त संतोष वाघुळे यांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0