चीनची दादागिरी: अमेरिकेने दंड थोपटले, विमानवाहू युद्धनौका केल्या तैनात

    दिनांक : 13-Jun-2020
Total Views |

USA_Navy_1  H x 

 
वॉशिंग्टन : जगातील इतर देश करोनाच्या संसर्गाशी दोन हात करत असताना चीनकडून विस्तारवादी भूमिकेला बळ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनकडून दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सैनिक तळ उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामरीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्राचे मोठे महत्त्व आहे. चीनने आणि शेजारील देशांमध्ये यावरून वाद सुरू आहेत. मागील काही महिन्यांपासून चीन आणि तैवानमधीलही वाद वाढले आहेत. तैवानच्या बेटावर ताबा मिळवू अशी धमकीच चीनने दिली होती. त्यानंतर दक्षिण चीन समुद्र भागातील तणाव वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
 
दक्षिण चीन समुद्रात चीन आपले वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामरीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्राचे मोठे महत्त्व आहे. चीनने आणि शेजारील देशांमध्ये यावरून वाद सुरू आहेत. या भागात चीनची दादागिरी वाढत असून अमेरिकेनेही याविरोधात दंड थोपटले आहेत. चीनच्या नौदलाकडून युद्ध सराव असल्यामुळे तैवानसह इतर देशांनीही काळजी व्यक्त केली होती. आता तैवानचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आपल्या तीन मोठ्या विमानवाहू युद्धनौका पाठवल्या आहेत. या तिन्ही विमानवाहू युद्ध नौका हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात तैनात करण्यात आल्या आहेत. वेळ पडल्यास या युद्धनौका चीनच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. जवळपास तीन वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेच्या या तिन्ही विमानवाहू युद्धनौका या भागात गस्त घालत आहेत. त्याशिवाय अमेरिकेचे ड्रोन, क्रूझर, लढाऊ विमानेदेखील गस्त घालत आहेत.