कुर्‍हा परिसरात कुत्र्यांकडून बिबट्याची शिकार

12 Jun 2020 22:07:43
 

lapord_1  H x W 
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्‍हा येथूनच जवळ असलेल्या कोर्‍हाळा-भोटा परिसरातील शेतकरी त्र्यंबक थेटे यांच्या शेतातील गट क्र २२६ मध्ये शुक्रवारी दहा ते बारा कुत्र्यांनी बिबट्यावर हल्ला चढविला. यावेळी शेतात काम करणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांनी कुत्र्यांना हाकलून लावले.
 
 
यादरम्यान बिबट्या शेतात पडलेल्या ठिंबक नळ्यांमध्ये जखमी अवस्थेत लपून बसल्याची माहिती स्थानिक शेतकर्‍यांनी वनक्षेत्रातील वनक्षेत्रपाल यांना माहिती दिली. या घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी क्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल के.जी पाटील, दिगंबर पाचपांडे, मनिषा मोरे ,सुप्रिया देवरे हजर झाले. त्यांना पाच ते सहा महिन्याचा बिबट्या शेतातील ठिबक नळ्यांच्या बंडलमध्ये जखमी अवस्थेत आढळला. त्यानंतर स्थानिक वनविभागाने रेस्क्यू टीम आल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले .मात्र तोपर्यंत जखमी बिबट्याची प्राणज्योत मालवली होती.
 
 
 
याप्रसंगी वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई फिरते पथकाचे वनपाल राजकुमार ठाकरे, व्याग्र बचाव दलाचे गणेश गवळी घटनास्थळी हजर होते. मात्र पाच ते सहा महिन्याच्या बिबट्यावर कुत्र्यांनी गंभीर जखमी केल्यामुळे त्याने जीव सोडला होता. घटनेमुळे पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकर्‍यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0