न्हावीत कोरोनाचा शिरकाव

12 Jun 2020 15:20:59

Nhavi Corona_1   
 
 
न्हावी ता.यावल : गेल्या अडीच महिनेमपासून न्हावीमध्ये प्रशासन,ग्रामपंचायत, स्वयंसेवक व गावकर्‍याच्या सहकार्याने लॉकडाऊन पाळला जात होता. कुंभारवाड्यातील 38 वर्षीय किराणा दुकानदार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात खडळबडळ उडाली आहे. तसेच दुकानातील 4 कर्मचारी आई व पत्नी याना विलीगिकरण कक्षेमध्ये क्वारंटाई करण्यात आले आहे.
 
 
पॉझिटिव्ह व्यक्तीस कोविड 19 जेटीएमला हलविण्यात आले. आरोग्य व प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी कुंभारवाडा, राधे राधे चौक संपूर्ण परिसर सील करण्यात आला.तसेच कुटुंबातील 11 जणांची थर्मल टेस्ट घेऊन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले.तसेच संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला. पॉझिटिव्ह व्यक्तीचे किराणा दुकान व गोडाऊन यांना पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे.
 
 
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, सरपंच भारती चौधरी, मेडिकल ऑफिसर डॉ.फिरोज तडवी, ग्राम विकास अधिकारी के.आर.देसले,तलाठी लीना राणे, पोलीस पाटील संजय चौधरी, डॉ. महाजन, बोरखेडा ग्रामसेवक हितेश महाजन, माजी उपसरपंच, न्हावी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत तळेले, रवींद्र तायडे व ग्रामपंचायत, तलाठी कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असून कोरोना प्रसारण होऊ नये यासाठी होम क्वारंटाईन करून घ्यावे असे प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0