चिंचगव्हाणला कृषी विभागाचा छापा

12 Jun 2020 15:13:57
11 टन बनावट रासायनिक खत जप्त, चढ्या भावाने विक्री
 

Chalisgaon Agricutural ra 
 
चाळीसगाव : तालुक्यातील चिंचगव्हाण येथे कृषी केंद्र चालकाकडे 11 रोजी कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून बनावट किसान ज्योती, एनपीके 18:18:10 या कंपनीचे 11 टन खते सुमारे 200 बॅगा कृषी विभागाने जप्त केल्या आहेत. सातारा यषथील बंद कंपनीच्या बनावट रासायनिक खतांचा साठा गुजरात येथून आणून शेतकर्‍यांना चढ्या भावाने विक्री करीत असल्याचे आढळून आले. तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रुपेश कृषी केंद्राने गुजरात राज्यातून आणलेले बनावट रासायनिक खत विक्रीचा डाव पुन्हा कृषी विभागाने उधळला गेला.
 
 
तालुक्यातील चिंचगव्हाण येथे रुपेश कृषी केंद्र चालकाकडे 11 रोजी कृषी विभागाच्या पथकाने छापा मारून बनावट किसान ज्योती,एनपीके 18:18:10 या कंपनीचे 11 टन खते सुमारे 200 बॅगा कृषी विभागाने जप्त केला. विशेष म्हणजे चाळीसगाव आणि चिंचगव्हाण येथे जप्त करण्यात आलेल्या बनावट रासायनिक खते साठ्याचा मालक शहरातील महावीर कृषी केंद्राचे संचालक मालक शैलेश जैन आणि कंपनी सुध्दा एकच आहे. चिंचगव्हाण येथील काशिनाथ कौतिक वाघ यांच्या शेतात शेड असलेल्या गोडाऊनमध्ये रुपेश कृषी केंद्राचा साठा असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा कृषी अधिकारी (गुणनियंत्रक व निरीक्षक) अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी(गुणनियंत्रक व निरीक्षक) सी.डी.साठे, तालुका गुणनियंत्रक व निरीक्षक समितीचे सदस्य एस.एन.भालेराव,कृषी सहायक पी.आर.पवार, टी.टी.खोत या पथकाने छापा टाकून साठा जप्त करण्यात आला.
 
Powered By Sangraha 9.0