अमेरिकेत कोरोनामुळे सप्टेंबरपर्यंत दोन लाख मृत्यू होणार - तज्ज्ञ

12 Jun 2020 15:27:17
 
America Coron_1 &nbs
 
वाशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत अमेरिका जगात सर्वात पुढे आहे. येथील मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस वाढत असून, तज्ञांनुसार हा आकडा लवकरच दोन लाखांपर्यंत पोहचू शकतो. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इंस्टिट्यूटचे प्रमुख आशिष झा यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, कठोर पावले न उचलल्यास कोरोनामुळे मृतांचा आकडा अधिक वाढू शकतो. भलेही कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी झाला असेल मात्र स्टेंबरपर्यंत 2 लाख लोकांचा यामुळे मृत्यू होऊ शकतो.
 
 
त्यांनी सांगितले की, ही केवळ सप्टेंबर महिन्यापर्यंतची शक्यता आहे. कारण महामारी सप्टेंबरमध्ये संपणार नाही. अमेरिकेत मृतांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. झा यांनी सांगितले की, अमेरिका एकमेव असा देश आहे जेथे कोरोनाला नियंत्रित न करता लॉकडाऊन उघडला आहे. येथे 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार्‍या कोरोनाग्रस्तांची संख्या 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क द्वारे हे मृत्यू रोखता आले असते.
Powered By Sangraha 9.0