केव्हाही येऊ शकतो महाराष्ट्रात मान्सून!

11 Jun 2020 15:23:40
 
news3_1  H x W:
 
पुणे : मान्सूनने पकडलेली गती पाहू जाता आगामी चोवीस तासांत केव्हाही महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होऊ शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आज बुधवारी वर्तविला आहे.
कोकण किनारपट्टीत सर्वप्रथम मान्सून दाखल होईल. गेल्या दोन दिवसांपासून तळकोकण आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. शुक्रवारपर्यंत मान्सूनचा पाऊस पुण्यात पोहोचेल आणि त्यानंतर मुंबईत दाखल होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली.
 
आता केव्हाही नैर्ऋत्य मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने, राज्यात पहिल्यात टप्प्यात जोरदार पाऊस पडेल. मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्याव आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यातही चांगला पाऊस पडेल, असेही वेधशाळेने म्हटले आहे.
 
तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस
कमी दाबाचा पट्टा आगामी 24 तासात उग्र रूप धारण करेल आणि त्याच्या प्रभावामुळे संपूर्ण विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस कोसळेल. काही भागांमध्ये पावसाचे स्वरूप वादळी असेल, तर काही ठिकाणी तो मुसळधार पडेल, असा इशाराही वेधशाळेने दिला आहे.
 
कर्नाटक, आंध्र, तेलंगणातही आजच आगमन
महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा, आंध्रप्रदेशची किनारपट्टी, संपूर्ण सिक्कीम, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही उद्या गुरुवारीच मान्सूनचे आगमन होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0