राज्य सरकारने केळी पिकासाठी फळपीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच ठेवावी

11 Jun 2020 21:26:44
खा. रक्षाताई खडसे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
 

MP Raksha_1  H  
जळगाव, ११ जून
राज्य सरकारने केळी पिकासाठी पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच लागू करावी, या मागणीचे निवेदन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकार्‍यांना दिले.
 
 
केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी राज्य सरकारने या विषयासंदर्भात तातडीने कार्यवाही केली नाही, तर भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही खा.रक्षाताई खडसेंनी यावेळी दिला.
 
 
यावेळी जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, किरण महाजन, राहुल पाटील, सुपडू पाटील, प्रल्हाद पाटील, रामदास पाटील, राजेंद्र पाटील, निखिल देशमुख, गणेश नेहेते, प्रेमानंद महाजन, विशाल महाजन, साहेबराव बडगुजर, प्रशांत महाजन, जितेंद्र मराठे, कृषिभूषण हेमचंद्र पाटील, डॉ.जगदीश पोळ, अनिल पाटील, पंकज पाटील हे शेतकरी उपस्थित होते.
 
 
पालकमंत्री आणि खासदारांची मतं वेगवेगळीकेळी पिकासाठी पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजना पूर्वीप्रमाणेच लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती. त्यामुळे पालकमंत्री शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत की खासदार रक्षाताई खडसेंना राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.खासदार रक्षा खडसेंच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी भाजपचे काही पदाधिकारी तसेच शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांची भेट घेतली. यावेळी केळी पिकासाठीच्या पुनरर्चित हवामान आधारित फळपीक विमा योजनेबाबत निवेदन सादर केले. या योजनेचे निकष पूर्वीप्रमाणेच असावेत, अशी या शिष्टमंडळाची मागणी होती. राज्य सरकारवर निष्क्रिय असल्याची टीका करत या योजनेचे निकष बदलले तर आंदोलनाचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0