आज १३० नवीन कोरोना बाधीत

11 Jun 2020 21:14:26
सलग तिसर्‍या दिवशी गाठली शंभरी !
 

corona_1  H x W 
जळगाव, ११ जून
जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १३० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून यामुळे सलग तिसर्‍या दिवशी रूग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. या विषाणूचा संसर्ग मोठ्या गतीने होत असल्याचे यावरुन दिसून आले आहे.
 
 
जिल्हा माहिती कार्यालयाने सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी जिल्ह्यात एकूण १३० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक २२ रूग्ण धरणगाव शहरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्यासह रावेर-२१; जळगाव-२०, जामनेर-१८, चोपडा, जळगाव ग्रामीण व भुसावळ प्रत्येकी पाच, भडगाव व यावल प्रत्येकी २ पाचोरा-३, पारोळा-९, बोदवड-४, एरंडोल १ असे रूग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, गुरुवारी लागोपाठ तिसर्‍या दिवशी कोरोना बाधीतांची संख्या शंभरच्या वर गेल्याने आता या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याचे अधोरेखीत झाले आहे.
Powered By Sangraha 9.0