शेतकर्‍याची आत्महत्या; ९ जणांना कोठडी

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |
 
Farmer Suicide_1 &nb
 
धुळे : शहरापासून जवळ असलेल्या सौंदाणे गावातील शेतकरी विजय पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी मोहाडी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. त्यांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. तसेच इतर सात संशयितांचा शोध सुरू आहे. नऊ संशयितांपैकी एक जण शासकीय सेवेत आहे. सौंदाणे गावातील शेतकरी विजय वसंत पाटील (वय ५५) यांनी नातलगांच्या जाचाला कंटाळून जलकुंभाच्या शिडीला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. रविवारी पहाटे हा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मृत विजय पाटील यांचा मुलगा गोपाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून १६ संशयितांनी वडिलांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर मोहाडी पोलिसांच्या पथकाने एकनाथ पाटील, सतीश पाटील, हेमंत पाटील, हेमराज पाटील, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, प्रशांत पाटील, वाल्मीक पाटील, कमलेश पाटील या नऊ जणांना रात्रीतून अटक केली.