वाढदिवसालाच कोरोनामुळे डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचे निधन

    दिनांक : 10-Jun-2020
Total Views |

DMK_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : कोरोनाने हातपाय पसरले असताना दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. अशातच डीएमकेचे आमदार जे. अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
 
जे. अनबालागन यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर खासजी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येत खालावल्याने त्यांचा आज मृत्यू झाला.
 
आमदार जे. अनबालागन हे डीएमके पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. कोरोनाच्या कठीण काळात त्यांनी लोकांसाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य केलं होतं. त्यांनी या मदतकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता.
 
आज त्यांचा वाढदिवस होता. त्यांनी वयाची 61 वर्ष पूर्ण करत 62 व्या वर्षात पदार्पण केलं होतं. आज वाढदिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकर्ते आणि हितचिंतकांवर तर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.