भाजपातर्फे मंडल क्र. ८ मध्ये केंद्र सरकारचे वर्षपूर्ती अभियान

10 Jun 2020 16:23:46
  

bjp_1  H x W: 0 
 
जळगाव : भाजपा मेहरूण मंडल क्र. ८ तर्फे प्रभाग क्र. १४ मध्ये सकाळी ११ वाजता, मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात, पहिले वर्ष पूर्ण झाले असून, भाजपा वर्षपूर्ती अभियान राबवत आहे, त्यानिमित्ताने प्रधानमंत्री मोदी यांचे माहिती पत्रक व तसेच आ. सुरेश भोळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणार्‍या होमोयोपॅथी गोळ्याचे ९०० नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले.
 
 
याप्रसंगी महापौर भारतीताई सोनवणे, भाजपा जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, वर्षपूर्ती अभियान संयोजक महेश जोशी, सहसंयोजक राहुल वाघ, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जेष्ठ नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे, मंडलअध्यक्ष विनोद मराठे, मंडल संयोजक महादू सोनवणे, सहसंयोजक रमेश मोर्या, मंडल सरचिटणीस दिपक बाविस्कर, मंडल उपाध्यक्ष उमेश सोनवणे, सुनील पाटील, निलेश घुगे पाटील, किशोर वाघ, गजानन वंजारी, बूथ प्रमुख,गणेश मोर्या, दिनेश ढाकणे, आकाश पारधे मंडल सोशल मीडिया प्रमुख राहुल गुंजाळ आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0