सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

10 Jun 2020 16:26:15

salun_1  H x W:
 
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २३ मार्चपासून लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून या कालावधीत सलून व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली असून त्यांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्या किंवा सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
 
लॉकडाऊनमध्ये बर्‍याच प्रमाणात सुट देवून इतर व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वेळोवेळी स्मरणपत्र (निवेदन) देवून सलुन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी किंवा आर्थिक मदतीची मागणी शासनाकडे केली होती. मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार हे आंदोलन महाराष्ट्र नाभिक महामंडळ अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली आज ९ रोजी महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनांवर जिल्हाध्यक्ष एकनाथ परशुराम शिरसाठ, प्रदेश कार्याध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत.
Powered By Sangraha 9.0