‘संचारबंदी’त कंजरवाड्याजवळ अवैध दारू विक्री जोरात

25 Mar 2020 18:56:19
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई, दोघास अटक
 
 
Liquor_1  H x W
 
तभा वृत्तसेवा
जळगाव, 24 मार्च
राज्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या दरम्यान शहरातील कंजरवाडा परिसरात खुलेआम दारू विक्री होत असून एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या पथकाने धडक कारवाई करुन दारू विक्री करणार्‍यांना अटक केली आहे. तसेच तुळजाईनगर, कुसुंबा (ता.जळगाव) येथून विनोद लोहार या देशी आणि विदेशी दारुच्या बाटल्यासह ताब्यात घेण्यात आले.
 
संचारबंदीमुळे शहरातील सर्व दारू विक्रीची दुकाने आणि बियरबार बंद आहेत. परंतु बर्‍याच ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे. या पार्श्वभूमिवर, मंगळवारी भर दिवसा कंजरवाडा परिसरात दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यांनी येथे छापा मारून एकास ताब्यात घेतले आहे.
 
ही कारवाई एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील, पो.काँ. गोविंदा पाटील, मुकेश पाटील, सचिन चौधरी या पथकाने केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0