बेशिस्त नागरिकांना पोलिसांनी आणले वठणीवर

    दिनांक : 25-Mar-2020
Total Views |
संचारबंदीचे पालन न करणार्‍यांनी घातल्या उठाबशा,
शहरात चोख पोलीस बंदोबस्त
 
 

Police_1  H x W 
 
तभा वृत्तसेवा
जळगाव, 24 मार्च
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तरीसुद्धा जिल्ह्यात तसेच शहरात अनेक ठिकाणी नागरिक तोंडाला मास्क/रुमाल न बांधून घराबाहेर पडत आहे. त्यामुळे अशा नागरिकांना पोलिसांनी चांगलीच अदल घडवत उठबशा करायला लावल्या. दरम्यान, कुठलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनाद करण्यात आला आहे.
 
शहरात संचारबंदी घोषित असताना मंगळवारी सकाळपासून अनेक ठिकाणी नागरिक जमाव करीत होते. तसेच दुचाकीवरुन शुल्लक कारणावरुन प्रवास करीत होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर दुपारी कोर्ट चौकात पोलिसांचा अशा बहादराणा थांबवत अठबशा करण्याची शिक्षा दिली.
 
संचारबंदी करूनही अनेक सुशिक्षित लोक सरकारने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. घराबाहेर पडू नका असे सांगूनही लोक रस्त्यावर येत आहेत.
 
जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी रविवारपासूनच कलम 144 चे आदेश लागू केले आहे. तसेच तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महानगरांच्या आणि मोठ्या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात येऊन सक्तीची संचारबंदी लागू करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
 
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलानेही तयारी केली असून, शहरात संचारबंदीचे आदेश सक्तीने पाळण्यात येणार असल्याचे डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस ठाणेनिहाय वायरलेस वाहने आपल्या हद्दीत फिरून बंदचे उल्लघंन करणार्‍यांवर कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच काम नसताना घराबाहेर पडू नका अशा सूचनाही पोलिसांकडून देण्यात येत आहे. दरम्यान, शहरात फळे, भाजीपाला, वैद्यकीय सेवा, किराणा वगळता सर्वच आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.
 
टॉवर चौकात चोख बंदोबस्त
सकाळी 10 वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संचारबंदीची उल्लंघन करणार्‍यावर कारवाई केली. यावेळी महिला पोलीस कर्मचार्‍यांनी दुचाकीवरून जाणार्‍या आणि येणार्‍या तरूणींची चौकशी केली. ऑफीसला येवू देण्याच्या बहाणा दाखविला जात होता. मात्र संचारबंदीत कोणतेही ऑफीस बंद ठेवण्यात आले असल्याने त्यांनी घरी माघारी पाठविण्यात आले.
 
भिलपुर्‍यात तिघांवर कारवाई
शहरातील भिलपूरा भागात सर्व धर्मिय समाज बांधव राहतात. तेथे संचारबंदीतही नागरिकांनी घरी बसने पसंत न केल्यामुळे नाइलाजास्तव पोलिसांनी खाक्या दाखविण्यात आला. या भागातील काही तरूणी ट्रिपल सिटने दुचाकीने जात असतांना पकडले. या तिघा तरूणांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील पोलिसांनी हानून पाडला आहे.
 
अनेक नागरिक माघारी
शनी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही.डी.ससे यांच्या उपस्थितीत बाजारपेठतील गजबजलेला भाग सुभाष चौकात ठाण मांडून होते. यावेळी व्यापार्‍यांची दुकाने सोडून इतर सर्व दुकाने मोठ्या प्रमाणावर बंद होते. शहरातील काही भागातील नागरिकांनी तोंडाला मास्क न लावता शहरातून मुक्तपणे संचार करत होते. त्यांना आलेल्या रोडवरून परत माघारी पाठविण्यात आले.
 
ओळखपत्राची चौकशी
शहरात मोठ्या प्रमाणावर दुकाने बंद होती. घरात असलेल्या आजारी रूग्णांना गोळ्या औषधी घेण्यात बाहेर पडलेल्या नागरिकांनी तोंडाला मास्क बांधलेले नव्हते. त्यांना शिक्षा म्हणून अंगावरील शर्ट काढून तोंडाला बांधायला लावले. काहींना दुचाकी थांबवून त्यांच्याजवळी आयकार्डची चौकशी सुरू होती. ज्यांच्याकडे आयकार्ड किवा ओळखपत्र नसेल त्यांना काठीचे दोन फटके देवून सोडून देण्यात येत होते.
 
मदतीचे दर्शन
सिंधी कॉलनी परीसरातील संत कंवरराम गेटजवळ आणि सिंधी कॉलनीच्या मेन गेटजवळदेखील पोलिसांनी चांगला पहारा दिला होत. यावेळी जवळच तांबापूरा हा संवेदनशिल भाग असल्यामुळे पोलिसांची उपस्थिती वाढविण्यात आली होती. सिंधी कॉलनी गेट जवळ एका चिमुकलीने पालकांच्या मदतीने आरोग्यासाठी कर्तव्यावर असल्याने त्यांना नास्ता आणि चहा देण्यात आले.
 
जीवाची काळजी न करता ऑन ड्युटी
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून स्वत:सह इतरांच्या सुरक्षेसाठी घरातच राहा असे सांगण्यात येत आहे. अशा काळातही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मात्र रस्त्यावर थांबून कर्तव्य बजावत आहेत. स्वतःच्या जिवाची काळजी न पोलीस ऑन ड्युटी 24 तास दक्ष आहेत. पोलीस स्वत:ची काळजी घेत असले तरी कुटुंबीयांना मात्र भीती वाटत आहे. पोलिसही माणूसच आहे की.. अशी भावना पोलीस कुटूंबीयांमधून व्यक्त होत आहे.
 
विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
शहरातील गुलाबबाबा कॉलनीत बॉम्बे फुटवेअर, सिंधी कॉलनीतील वालेचा मार्केटमध्ये सलून दुकानदार रामभाऊ झिपरु जगताप (वय 53), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयासमोरील आइस्क्रीम पार्लर चालक भूषण ज्ञानदेव सरोदे (वय 35), अजिंठा चौकातील युनिक ऑटो इलेक्ट्रिक वर्क चालक अबू बकर बशीर खान (वय 45), रामेश्वर कॉलनीतील आम्रपाली सलून दुकानचालक राजू रंगनाथ सूर्यवंशी (वय 30), देवेंद्र दिलीप पाटील (वय 22), अशोक किराणासमोरील पानटपरी चालक, संदीप बाबूराव देशमुख (वय 28) हा अंडापाव विक्रेता अशांवर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.