जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर

01 Nov 2020 20:21:55
दिवसभरात आढळले ३८ नवे रुग्ण, ८६ जण कोरोनामुक्त

 
dfnk_1  H x W:
 
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात रविवारी ८६ रुग्ण बरे होवून घरी परतले असून जिल्हाचा रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच रविवारी जिल्ह्यात ३८ नवीन रुग्ण आढळून आले. तर कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
 
राज्यासह जिल्ह्यात कोरोना कहर कमी झालेला दिसत आहे. दिवसाला पाचशेच्या पटीत वाढणारी रुग्णसंख्या गेल्या महिन्यापासून खूपच कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापासून शंभरहून कमी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच जिल्ह्यात दहा हजारापर्यंत असलेले संक्रिय रुग्णांची संख्या सध्या ७९१ वर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासकीय यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी झाल्याचे दिसत आहे.
 
जिल्ह्यात ७९१ रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५३ हजार २३१ इतकी आहे. त्यापैकी ५१ हजार १७२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार २६८ रूग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात विविध कोविड सेंटरमध्ये ७९१ रूग्ण उपचार घेत आहे. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९६.१३ टक्क्यांवर पोहचला असून मृत्यूदर २.३८ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.सी.चव्हाण यांनी दिली आहे.
 
आजची आकडेवारी अशी
नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण १, भुसावळ १, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा ०, भडगाव ०, धरणगाव १, यावल १, एरंडोल ०, जामनेर ४, रावेर ६, पारोळा ०, चाळीसगाव २, मुक्ताईनगर ०, बोदवड १ असे एकूण ३८ जणांचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0