जिल्ह्यात दिवभरात ८८९ रुग्ण कोरोनामुक्त

    दिनांक : 02-Oct-2020
Total Views |
३२२ नवीन रग्णांची भर, रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर

dfnk_1  H x W:  
 
जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यासह शहरात रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असून शुक्रवारीही ३२२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात जिल्ह्यातून ८८९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातून रिकव्हरी रेट ८६.७६ टक्क्यांपर्यंत आला असून मृत्यूदर २.४४ टक्के झाला आहे.
 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या प्रमाणाला गेल्या काही दिवसांपासून कमी आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नवीन रुग्णांच्या तिप्पट असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण कमी झालेला आहे. तसेच शुक्रवारी दिवसभरात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, हे विशेष.
 
असे आहेत नवीन रुग्ण
नवीन आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता जळगाव शहर ६९, जळगाव ग्रामीण ९, भुसावळ २८, अमळनेर १४, चोपडा २५, पाचोरा १७, भडगाव १६, धरणगाव ४, यावल १४, एरंडोल ५, जामनेर ६, रावेर ५, पारोळा ६, चाळीसगाव १९, मुक्ताईनगर ७७, बोदवड ६ आणि इतर जिल्ह्यांमधील २ असे एकूण ३२२ रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात एकूण रूग्ण संख्या ४८ हजार ८०६ वर पोहचली आहे.
 
दिवसभरात एकाचा मृत्यू
दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ८८९ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ४२ हजार ४५४ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी १ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९१ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार २७२ रूग्णांवर उपचार सुरू आहे.